Ravsaheb danve.jpg 
छत्रपती संभाजीनगर

हल्ली पावसात भिजणाऱ्यांना चांगले यश, म्हणून मी ही पावसात भिजतो : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

प्रकाश बनकर

औरंगाबाद : पावसात भिजणाऱ्यांना हल्ली चांगले यश मिळते. असे म्हटल्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून जोरदार हास्यकल्लोळ केला. असे वक्तव्य करुन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेव दानवे यांनी नेहमीप्रमाणे उपस्थितांचे मने जिंकली. तर राजकीय सूचक करीत ते पुढे म्हणाले की, आता नाही पण कदाचित पुढचे संकेत असे असू शकतात. म्हणून पाऊस जरी पडला तरी मी भाषणाला उभा राहिलो. 

कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद येथे शुक्रवारी ता.३१ विविध विकास कामांचे भूमीपूजन झाले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे उदघाटन त्यांनी केले. 

त्यानंतर ते उपस्थितांना संबोधन करण्यासाठी मंचावर उपस्थित राहिले. तोच या प्रसंगी अतिशय जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी ते सुरुवातीलाच म्हणाले की,  येऊ द्या पावसाला. पावसात भिजणाऱ्यांना हल्ली चांगले यश मिळते. असे म्हटल्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून जोरदार हास्यकल्लोळ केला. ते पुढे म्हणाले की आता नाही पण कदाचित पुढचे संकेत असे असू शकतात. म्हणून पाऊस जरी पडला तरी मी भाषणाला उभा राहिलो. दानवे म्हणाले की, अशा प्रकारचे पुतळे जेथे असतात. तेथे आपणाला प्रेरणा मिळते. महाराष्ट्रात, राज्यात, देशात असे पुतळे उभे करण्याचे कारण म्हणजे आपल्याला प्रेरणा मिळते. 

शेतकऱ्यांना मिळेल प्रेरणा 
औरंगाबाद मधील ही बाजारपेठ असून  येथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला छत्रपतींचे दर्शन घेतल्यावर प्रेरणा मिळेल. असे ही दानवे यांनी सांगितले. 

संसदेतील काढली आठवण 
संसदेमध्ये विविध महापुरूशांचे पुतळे होते. मात्र शिवरायांचा पुतळा नव्हता. त्यावेळी आम्ही सर्व खासदारांनी एकत्र येऊन छत्रपतींचा पुतळा उभा रहावा यासाठी पुढाकार घेतला. 

मका खरेदी साठी मागणी करावी 
राज्य सरकारने केंद्राकडे मका खरेदी साठी आणखी मागणी करायला हवी केंद्र सरकार पैसे द्यायला तयार आहेत फक्त राज्य सरकारला खरेदीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

राज्य सरकारचे स्टेरिंग कधी एकाच्या तर कधी दुसऱ्याच्या हातात 
राज्य सरकारचे स्टेरिंग कधी एकाच्या हातात तर कधी दुसऱ्याच्या हातात असते हे स्टेरिंग एकाच व्यक्तीच्या हातात असायला पाहिजे, नाहीतर मोठा अपघात घडल्याशिवाय राहीणार नाही. असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद सांगितले.

(संपादन-प्रताप अवचार) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

Kankavli Assault Case: गणपतीला माहेरी आली, जमिनीच्या वादातून आई-भावंडांसह पाच जणांकडून बेदम मारहाण

सासूसोबत जिनिलीयाचं खास बॉण्डिंग, घरच्या गणपतीची लगबग; देशमुख कुटुंबाचे फोटो व्हायरल

Latest Marathi News Update : धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

IND vs AFG, T20I: मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज! सॅमसनच्या कामगिरीकडे लक्ष, पाचव्या गोलंदाजाची चिंता कायम; कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT